रानबांबुळी

गावाचा इतिहास

रानबांबुळी हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. रानबांबुळी हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे 22किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे 03 किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये 10 वाड्या आहेत. गावची लोकसंख्या २०७४ इतकी आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये दोन प्राथमिक शाळा आहेत. गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये 6 कार्यकारिणी सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व 5 कर्मचारी आहेत.

भौगोलिक परिस्थिती

रानबांबुळी गावाला भौगोलिक सौंदर्याचा वारसा मिळालेला आहे. गावातील वृक्षवल्लीं गावची शोभा वाढवतात. गावात प्रत्येक कार्यक्रम साजरे केले जातात जसे कि शिवजयंती . मा. बाबासाहेब आंबेडकर जयंती , महिला दिन दिंड्या वेशभूषा ई. गावाला लागुनच दाभाची वाडी धरण आहे. येथील हवामान उष्ण व दमट प्रकारचे आहे. त्यामुळे दोन्ही हंगामात भाताचे पिक घेतले जाते.

ग्रामपंचायतीबद्दल व इतर माहिती

रानबांबुळी हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. रानबांबुळी हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे 22किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे 03 किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये 10 वाड्या आहेत. गावची लोकसंख्या २०७४ इतकी आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये दोन प्राथमिक शाळा आहेत. गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये 6 कार्यकारिणी सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व 5 कर्मचारी आहेत.

प्राथमिक माहिती
  • ग्रामपंचायत स्थापना दिनांक : 14-12-1969

  • एकूण लोकसंख्या : 2074

  • एकूण कुटुंबे : 723

  • पुरुष : 1052

  • महिला : 1022

  • मतदारांची संख्या -2074

  • पुरुष - 1052- स्त्री - 1022

  • एकूण क्षेत्रफळ - 774.68 hectares

  • लागवडी योग्य क्षेत्र - 299.41 hectares

  • वन क्षेत्र - 20.17 hectares

  • बागायत क्षेत्र – 25.20 hectares

  • अंगणवाडी- 3,

  • जिल्हा परिषद शाळा - 2

  • सार्वजनिक मंदिर- 2

  • सार्वजनिक विहीर - 15